Join us

कवठेवाडी गावाचा झाला कायापालट

By admin | Updated: May 15, 2014 01:40 IST

कर्जत तालुक्यातील कवठेवाडी ही आदिवासी वस्ती असलेल्या गावाचा कायापालट होत आहे.

कर्जत : कर्जत तालुक्यातील कवठेवाडी ही आदिवासी वस्ती असलेल्या गावाचा कायापालट होत आहे. साऊथ इंडिअन ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी लोकांच्या जीवनात आता सोनेरी दिवस येऊ लागले आहेत. या प्रकल्पाचे रविवार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे. कवठेवाडी जेमतेम नव्वद घरांची वस्ती असलेले आदिवासी गाव . कर्जत तालुक्यातील भीमाशंकर राज्य मार्गावर नेरळ -कशेळे रस्त्यावर अडखळती वाट बाजूला करीत तेथे जावे लागते . कशेळे ग्रामपंचायत मध्ये असलेल्या कवठेवाडीमध्ये अद्याप स्वच्छ पाणी नाही . गावाच्या खालच्या बाजूला असलेल्या विहिरीवरून डोक्यावर हंडे घेवून आदिवासी महिला वर्षानुवर्षे आपला जीवनक्र म सुरु ठेवून आहेत . त्याच कवठेवाडीतील आदिवासी लोकांची घरे दुरु स्त करण्याचा प्रयत्न इंडिया बिल्ड कर्याक्र मांतर्गत झाला . त्यांच्या चावी वाटप कार्यक्र माला खुद्द राज्याचे राज्यपाल उपस्थित होते . मात्र कर्जाचे ते ओझे आदिवासी लोकांच्या डोक्यावर असतांना गावातील गणेश कृपा मित्रमंडळाने ते कर्जाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला . त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने देशातील आघाडीची शिक्षण संस्था म्हणून नाव असलेल्या साऊथ इंडिअन ट्रस्टला कवठेवाडीत खेचून आणले . ग्रामस्थांनी प्रथम सार्वजनिक कार्यक्रमासाठी सभागृह बांधून मागितले होते. मात्र ट्रस्टने केवळ सभागृह नाही तर संपूर्ण गाव नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला आणि गावातील सर्व नव्वद घरे नव्याने बांधून त्यांची एक रंगसंगती, महिला आणि पुरु षांसाठी शौचालय, गावातील सर्व रस्ते सिमेंटचे बनवून त्यावर पेव्हर ब्लॉक अशी कामे गावात करण्यात आली आहे. (वार्ताहर)