नेरळ : ज्येष्ठ निरु पणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील अनेक रस्त्यांच्या दुतर्फा हिरवाई फुललेली दिसून येत आहे. अनेक ओसाड टेकड्या हिरव्यागार होत असताना कर्जत तालुक्यातील मुख्य रस्ता असलेला मुरबाड रोड देखील हिरवागार होण्याच्या प्राथमिक अवस्थेत आहे. शेकडो श्री सदस्यांनी कर्जत- मुरबाड रस्त्याच्या कडाव भागामध्ये विविध औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.वृक्ष संवर्धनाचा संदेश देवून ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचे काम रायगड जिल्ह्यात नाही तर राज्याच्या अनेक भागात श्री सदस्यांनी करून दाखवले आहे. अलिबाग परिसरातील अनेक रस्त्यांच्या दुतर्फा हिरवाई फुलविली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ओसाड टेकड्याच्या ठिकाणी झाडे लावली होती. त्यावेळी श्री सदस्य केवळ झाडे लावून शांत बसले नाहीत. त्यांनी त्या झाडांचे संगोपन देखील केले. कर्जत तालुक्यात हा उपक्र म हजारो श्री सदस्यांनी राबविला होता.आता प्रमुख रस्ते यांचा परिसर हिरवागार झाला पाहिजे यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते हे रु ंद केले जात होते, त्यामुळे कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली नव्हती, अशी माहिती कर्जत तालुका श्री सदस्य बैठकीचे समन्वयक श्रीधर बुंधाटे यांनी स्पष्ट दिली.कर्जत-मुरबाड रस्त्यावरील कडावपर्यंतच्या भागातील नऊ किलोमीटरच्या भागात औषधी वनस्पतींची लागवड श्रीसदस्यांनी केली. त्यावेळी या वृक्षलागवड कार्यक्र माचे उद्घाटनप्रसंगी प्रांत अधिकारी राजेंद्र बोरकर, पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील, तहसीलदार रवींद्र बाविस्कर आदी उपस्थित होते.
कर्जत-कडाव मुख्य रस्ता होणार हिरवागार
By admin | Updated: July 14, 2015 22:54 IST