Join us

‘सिंह इज ब्लिंग’मध्ये अक्षयसोबत करिना

By admin | Updated: June 6, 2014 00:39 IST

अभिनेत्री करीना कपूर आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी एकत्र दिसली नव्हती.

अभिनेत्री करीना कपूर आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी एकत्र दिसली नव्हती. आता मात्र ‘सिंह इज ब्लिंग’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसांपासून करीना बॉलीवूडमध्ये सक्रिय झाली आहे. तिने सुजॉय घोषच्या ‘दुर्गा राणी’ या चित्रपटात मुख्य भूमिका पटकावली असून विजय नांबियारच्या आगामी चित्रपटातही तिची वर्णी लागली असल्याची बातमी आहे. ‘सिंह इज ब्लिंग’चे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे. प्रभुदेवाच्या मते, त्याच्या चित्रपटांमध्ये हिरोईन्सनाही चांगला स्कोप असतो. या चित्रपटात करीनालाही दमदार भूमिका करायला मिळेल.