Join us  

'क्वीन'च्या अडचणीत वाढ; बीएमसी कंगनाच्या कार्यालयापाठोपाठ घरावरही कारवाई करणार?

By कुणाल गवाणकर | Published: January 01, 2021 10:39 PM

पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी कंगनानं केलेली याचिका फेटाळली

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत विरुद्ध मुंबई महानगरपालिका असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कंगनानं तिच्या घराच्या आराखड्यात मोठे बदल केले असून त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचं मुंबईतील दिवाणी न्यायालयानं म्हटलं आहे. घराच्या आराखड्यात बदल केल्यानं पालिकेनं कंगनाला नोटीस पाठवली होती. पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी कंगनानं न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं कंगनाची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे.मुंबई महापालिकेनं बजावलेल्या नोटिशीविरोधात कंगनानं न्यायालयात याचिका दाखल केल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे. कंगनानं घरात अवैध बांधकाम केल्याचं पालिकेनं नोटिशीत नमूद केलं आहे. तीन फ्लॅटचं रुपांतर एका फ्लॅटमध्ये करण्यात आल्याचा उल्लेखही नोटिशीमध्ये आहे. कंगनानं फ्लॅटमध्ये बदल करताना नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. हा दावा योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं.नोटिशीत उल्लंघनांचा स्पष्ट उल्लेख नाही; कंगनाच्या वकिलांचा युक्तिवादपालिकेनं पाठवलेल्या नोटिशीत उल्लंघन करण्यात आलेल्या नियमांचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा युक्तिवाद कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी केला. सिद्दीकी यांचा युक्तिवाद पालिकेचे वकील धर्मेश व्यास यांनी खोडून काढला. 'पालिकेच्या अभियंत्यानं कंगनाच्या घराचं सर्वेक्षण केलं होतं. त्या अभियंत्यानं ८ उल्लंघनांचा स्पष्टपणे उल्लेख केला होता,' असं व्यास म्हणाले.

टॅग्स :कंगना राणौतमुंबई महानगरपालिका