Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रनाैतला जुहू पोलिसांकडून समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:06 IST

आज हजर रहावे लागणार : जावेद अख्तर मानहानी प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लेखक आणि ...

आज हजर रहावे लागणार : जावेद अख्तर मानहानी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्याबाबत कथित मानहानी प्रकरणात जुहू पोलिसांनी अभिनेत्री कंगना रनाैतला समन्स पाठविले आहेत. त्यानुसार तिने शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर राहणे आवश्यक आहे.

अख्तर यांनी अंधेरी न्यायालयात कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला होता. त्यानुसार याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने १९ डिसेंबर २०२० रोजी जुहू पोलिसांना दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी १ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल. त्याच्याच चौकशीसाठी शुक्रवार म्हणजे २२ जानेवारी २०२१ रोजी तिने पोलीस ठाण्यात हजेरी लावणे गरजेचे आहे. कंगनाने माध्यमांसमाेर अख्तर यांच्याबाबत अपमानास्पद आणि मानहानी करणारे वक्तव्य केले, असा त्यांचा आरोप आहे. यामागील तथ्य दोघांच्याही परिचयातील एका डॉक्टरांना माहीत असून, पोलीस त्या डॉक्टरांचाही जबाब नोंदविणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

.....................