Join us

समन्सविरोधात कंगना रनौतची सत्र न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:08 IST

जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी ...

जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या जामीनपात्र वाॅरंटविरोधात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. कंगनाच्या या अर्जावर १५ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येईल.

समन्स बजावूनही कंगना १ मार्च रोजी उपस्थित न राहिल्याने अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात अटकपात्र जामीन जारी केले.

जावेद अख्तर यांनी केलेल्या तक्रारीत सकृतदर्शनी तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावले. अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाईड गँग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली. यूट्युबवर ही क्लिप खूप पसरली, असे अख्तर यांनी याचिकेत नमूद केले.

..........................................