Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीत काँग्रेसला ‘खिंडार’

By admin | Updated: January 9, 2017 07:06 IST

काँग्रेसचे कांदिवली येथील प्रभाग क्रमांक ३४चे नगरसेवक आणि आर (दक्षिण) प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई : काँग्रेसचे कांदिवली येथील प्रभाग क्रमांक ३४चे नगरसेवक आणि आर (दक्षिण) प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’त त्यांना शिवबंधन बांधले.मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने आपले कुठेतरी राजकीय बस्तान बसावे, म्हणून राजकीय पक्षांत इनकमिंग सुरू झाले आहे. नुकतेच उत्तर मुंबईतील तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसचे कांदिवली येथील नगरसेवक योगेश भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, कांदिवलीतल्या ठाकूर गटापैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान, उत्तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिद्धी फुरसुंगे आणि संध्या दोशी यांनी यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या खेळीमुळे या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश सुकर झाला. त्यामुळे शिवसेनेची ताकद उत्तर मुंबईत वाढली आहे. (प्रतिनिधी)