Join us

कांदिवलीत जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: July 28, 2016 17:05 IST

कांदिवलीत जलवाहिन्या फुटण्याचे सत्र अजुन सुरूच आहे. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गुरुवारी दुपारी कांदिवलीच्या डहाणूकरवाडीमध्ये पुन्हा एक मोठी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ : कांदिवलीत जलवाहिन्या फुटण्याचे सत्र अजुन सुरूच आहे. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गुरुवारी दुपारी कांदिवलीच्या डहाणूकरवाडीमध्ये पुन्हा एक मोठी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. यातुन वाहणाऱ्या पाण्याचा फोर्स इतका प्रचंड होता की कांदिवलिच्या रस्त्यांवर पुर परिस्थिती निर्माण झाली होती. पी दक्षिणच्या जल विभागाकडुन केल्या जाणाऱ्या हलगर्जीपणामुळे वारंवार जलवाहिन्या फुटुन पाण्याची नासाडी होत असुन गेल्या पंधरा दिवसात जलवाहिनी फुटण्याची ही तिसरी घटना आहे.