मुंबई : महापालिकेद्वारे पी/उत्तर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी कांदिवली (पूर्व) येथे १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर ७५० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून बुधवारी सकाळी ६.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कालावधीत कांदिवली व मालाडमधील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.नेबरहूड झोन, अनितानगर आणि आॅर्चिड, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व) या परिसरातील पाणीपुरवठा मंगळवारी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात येईल. आलिकानगर, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व) या परिसरातील पाणीपुरवठा दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत करण्यात येईल. स्प्रिंग लिफ, व्हिस्परिंग पाम, गंगा बावडी, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व) या परिसरातील पाणीपुरवठा सकाळी १०.३० ते सायंकाळी ३.३० या वेळेत करण्यात येईल. त्याचप्रमाणे, आर/दक्षिण विभागातील लोखंडवाला म्हाडा वसाहत, कांदिवली (पूर्व) या परिसरातील पाणीपुरवठा सकाळी ६.३० ते ११.३० या वेळेत करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कांदिवली-मालाडमध्ये उद्या पाणीपुुरवठ्यात बदल
By admin | Updated: March 2, 2015 03:30 IST