Join us

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च

By admin | Updated: November 14, 2014 01:23 IST

अहमदनगरमधील जवखेडे गावात घडलेल्या तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी चेंबूरमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला.

मुंबई : अहमदनगरमधील जवखेडे गावात घडलेल्या तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी चेंबूरमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला. या वेळी विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह रहिवाशांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला होता.
अहमदनगरच्या जवखेडे गावात जाधव कुटुंबीयांतील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राज्यभर अनेक संघटना आंदोलने करून आपला निषेध नोंदवत आहेत. या आरोपींना तत्काळ पकडून त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. अशाच प्रकारे या घटनेचा 
निषेध करण्यासाठी चेंबूरमध्ये चेंबूर नाका ते आंबेडकर उद्यान अशा कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले 
होते. 
चेंबूरमधील राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या कॅण्डल मार्चमध्ये परिसरातील सामजिक कार्यकर्ते जितू शिंदे, अॅडव्होकेट विश्वास कश्यप तसेच परिसरातील चारशे ते पाचशे रहिवासी सहभागी झाले होते. ही निर्घृण हत्या करणा:या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, तसेच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या कॅण्डल मार्चमध्ये सामील झालेल्या रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)