पनवेल : कामोठे सेक्टर - ७ येथील दीपक अपार्टमेंटमध्ये आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जुबेर शेख यांच्या घराला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही, मात्र या आगीच्या घटनेमध्ये घरातील सर्व सामान जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.जुबेर शेख व त्यांच्या घरातील सदस्य दुपारी काही कामानिमित्ताने घरातून बाहेर गेले होते. त्या वेळेस दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. घरातून धूर येत असल्याचे सोसायटीमधील रहिवाशांनी पाहिले व तात्काळ सिडकोच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. (वार्ताहर)
कामोठेत घराला आग
By admin | Updated: January 13, 2015 01:05 IST