Join us  

कमला मिल प्रकरण : पालिका आयुक्तच अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:49 AM

कमला मिल दुर्घटनेत पाच अधिका-यांचे निलंबन केल्यानंतर आता महापालिका आयुक्तांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जानेवारी २०१७मध्ये काही अटी शिथिल करीत कमला मिल कम्पाउंडमध्ये एका इमारतीत १८ रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा आरोप अ‍ॅड. आभा सिंह यांनी केला आहे.

मुंबई  - कमला मिल दुर्घटनेत पाच अधिका-यांचे निलंबन केल्यानंतर आता महापालिका आयुक्तांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जानेवारी २०१७मध्ये काही अटी शिथिल करीत कमला मिल कम्पाउंडमध्ये एका इमारतीत १८ रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा आरोप अ‍ॅड. आभा सिंह यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही हा मुद्दा उचलून धरत या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मंगळवारी केली. या प्रकरणात आयुक्त दोषी आढळल्यास आयुक्त हटाव मोहीम छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव्ह आणि मोजोज् ब्रिस्ट्रो बारमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने पालिका आयुक्त अजय मेहता यांनी जी दक्षिण विभागाच्या पाच अधिकाºयांचे निलंबन केले. मात्र सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची केवळ बदली करण्यात आली. त्यामुळे आयुक्त अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. तर आयुक्तांनीच अट शिथिल केल्यामुळे कमला मिल कम्पाउंडमध्ये १८ रेस्टॉरंट, पबला परवानगी मिळाली, असा आरोप होत आहे.या दुर्घटनेपूर्वी येथील स्थानिक कार्यकर्ते उत्तम सांडव व मंगेश कसालकर यांनी कमला मिल कम्पाउंडमधील अनेक हॉटेल, बार, पब्स बेकायदेशीर चालतात, याबाबत पत्र लिहून संबंधित पालिका कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नावालादेखील नाही, अनेकांनी जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे, याबाबत त्यांनी तक्रार केली होती. मात्र वॉर्डातील संबंधित अधिकाºयांनी चौकशीत असे काहीही आढळलेले नाही, असे उत्तर दिले होते.आयुक्त हटाव मोहीमआयुक्तांनी पाच अधिकाºयांना निलंबित केले असले तरी तेवढेच दोषी असणाºया सहायक आयुक्तांची बदली करून त्यांना पाठीशी घातले आहे. त्यामुळे आयुक्तांमार्फत नव्हे, तर न्यायालयामार्फत चौकशी व्हावी.यात पालिका अधिकारीदोषी आढळल्यास मनसेतर्फे आयुक्त हटाव मोहीम सुरू केली जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.दरम्यान मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आदींकडून या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी जोर धरीत असल्याने आयुक्त अडचणीत आले आहेत.कमला मिलच्या मालकाविरोधात समन्समुंबई : एमआरटीपी अंतर्गत दाखल गुन्ह्यात कमला मिलचा मालक रमेश गोवानीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी मंगळवारी समन्स बजावले, तर अन्य पसार आरोपींचा शोध सुरू आहे.कमला मिल आगप्रकरणी वन अबव्हच्या तीन संचालकांसह व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असताना एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी वन अबव्हचे दोन व्यवस्थापक केवीन बावा, लिसबॉन लोपेजला बेड्या ठोकल्या. घटनेच्या दिवशी ग्राहकांना वाचविण्याऐवजी दोघेही आधी पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे.पालिकेच्या तक्रारीवरून एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी एमआरटीपीअंतर्गत ३ स्वतंत्र गुन्हे दाखल केले. यात वन अबव्ह, मोजोस, रघुवंशी मिलमधील पी-२२ च्या संचालकांचा समावेश आहे. यापैकी दोन गुन्ह्यांत कमला मिलचा मालक रमेश गोवानीही आरोपी आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मंगळवारी पोलिसांनी गोवानीला समन्स बजावले. त्याचा जबाब नोंदविण्यात येईल. त्याच्याकडे कमला मिल आगप्रकरणीही चौकशी करण्यात येणार आहे.अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावरमुंबई : कमला मिल कम्पाउंडमध्ये आग लागलेल्या दोन्ही रेस्टॉरंटमध्ये अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून, ग्राहकांसाठी मृत्यूचा सापळाच रचला असल्याचे समोर आले आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंगळवारी सकाळी केलेल्या पाहणीतून हे उजेडात आले आहे. मेहता यांच्याकडून चौकशीची सूत्रे काढून घेण्याची मागणी होत असताना, त्यांनी अधिकाºयांची फौज घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.आगीपासून बचावासाठी मोकळी जागा (रेफ्युजी एरिया) ठरू शकणाºया गच्चीवर हा व्यवसाय सुरू होता. त्यात गच्ची प्लॅस्टिक शेडने झाकल्यामुळे आत अडकलेले बाहेर पडू शकले नाहीत. अरुंद मार्ग, अंधारामुळे बाहेर पडणे आणखी अवघड झाले. हॉटेलच्या बाहेर पडण्याचा मार्ग दर्शविणारे फलक नसल्याने ग्राहक बिथरले, असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. प्रथमदर्शींनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आयुक्तांनी सांगितले. ८ जानेवारीला दुपारी अडीच वाजता आयुक्तांकडे येऊन माहिती द्यावी. समोर येऊ न इच्छिणाºयांनी ेू.ील्ल०४्र१८.‘ेंं’ं@ॅें्र’.ूङ्मे या मेलवर माहिती पाठवावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.शॉर्ट सर्किटमुळे नव्हे, हुक्क्यामुळे आग!मुंबई : कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीचा उगम अद्याप कळू शकलेला नाही. मात्र या आगीचे कारण शॉर्ट सर्किट नसल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पबमध्ये होणारे स्टंट किंवा हुक्क्यामधील कोळशामुळे ही आग भडकली असण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. त्यामुळे ही शक्यताही आता पडताळण्यात येत आहे. या प्रकरणी अग्निशमन दल दोन दिवसांत पालिका आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे.महापालिकेने गच्चीवर रेस्टॉरंटला नुकतीच परवानगी दिली आहे. मात्र तिथे अन्न शिजवण्यास मनाई आहे, त्याप्रमाणे पबमध्ये होणारे आगीचे खेळ करण्यासही प्रतिबंध आहे. तसेच परवाना नसतानाही या ठिकाणी हुक्का देण्यात येत होता असे समोर आले आहे. त्यामुळे मोजोज् ब्रिस्ट्रोमधील हुक्क्याच्या निखाºयातूनच आगीचा भडका उडाला का, यादृष्टीने मुंबई अग्निशमन दलाने चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी आगीचे चित्रीकरण असलेल्या तीन व्हिडीओ क्लिप एकत्रित केल्या आहेत. त्यानुसार आग मोजोज्मधूनच सुरू झाल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांत आगीचे कारण आणि उगम स्पष्ट करणारा अहवाल अग्निशमन दल पालिका आयुक्तांना सादर करेल.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवआयुक्तमुंबई महानगरपालिका