Join us  

#KamalaMillsFire: कमला मिल प्रकरणात हायप्रोफाईल कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:43 AM

मुंबई : कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीत वन अबव्ह आणि मोजोस पब जळून खाक झाले.

मुंबई : कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीत वन अबव्ह आणि मोजोस पब जळून खाक झाले. यापैकी मोजोसमध्ये एका माजी पोलीस महासंचालक के.के. पाठक यांचा मुलगा युग याची भागीदारी आहे. तर या हॉटेलमध्ये शंकर महादेवन यांची देखील भागीदारी आहे. या प्रकरणात अद्याप मोजोसवर गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच वन अबव्ह हॉटेल मालक अभिजित मानकर हा महिला बालकल्याणचे निवृत्त उपायुक्त अशोक मानकर यांचा मुलगा आहे. लोअर परळच्या कमला मिल कंपाउंडमध्ये २२ हून अधिक हॉटेल्स आहेत. नेहमीच या परिसरात रात्रीची गर्दी असते. अशात वन अबव्ह आणि मोजोसमुळे या गर्दीत नेहमीच भर पडते. वन अबव्हमध्ये थर्टीफर्स्टनिमित्ताने मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती. दोन्हीही पब शेजारीच आहेत. यापैकी वन अबव्हच्या क्रिपेश संघवी, जीगर संघवी, अभिजित मानकर या संचालकांविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप मोजोसवर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. मात्र काही प्रत्यक्षदर्शींकडून ती आग मोजोसमधून भडकल्याचेही बोलले जात आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी दिली.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवकमलामिल्स