अनिकेत घमंडी, डोंबिवलीकोट्यवधींच्या नव्या बस आगारात उभ्या असतानाच आता आहेत जुन्या बसमध्येही देखभालीचा अभाव असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा पंक्चर झाल्याची टीका प्रवाशांनी केली. मंगळवारी बाजीप्रभू चौकातून सुटणाऱ्या परिवहच्या वाहनतळामध्ये ६ बसमध्ये बिघाड झाला. त्यातील ५ बसचे टायर पंक्चर तर अन्य एका बसमध्ये तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवली होती.या भोंगळ कारभाराला प्रशासनासह सभापतींचा कानाडोळा होत असल्याने नाराजी व्यक्त करून त्यांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांनी या संदर्भात परिवहनच्या कार्यालयाशी संपर्क साधला परंतु, तांत्रिक बाब असल्याचे सांगून अधिकारी-कर्मचा-यांनी हात वर केल्याचे दिसून आले. सकाळी साडेसहा ते नऊपर्यंत ही समस्या उद्भवल्याने अवघ्या अडीच तासात सहा बस फेऱ्यांमधून बाद झाल्याने प्रवाशांना त्रास झाला. (प्रतिनिधी)या क्र मांकाच्या बसमध्ये होती समस्या १९५ १७७, १६९, १६२, १७८ या मोठयÞा तर ४५४ या मिडी बसमध्ये समस्या होती. त्यातील एका बस मध्ये कॉम्प्रेसर फेल तर अन्य ५ बसमध्ये टायर पंक्चरची समस्या उद्भवल्याचे निदर्शनास आले.या रु टवर जाणार होत्या बस पनवेल, निवासी विभाग, लोढा, नांदिवली आणि गोग्रासवाडी परिसरात त्यांच्या फेऱ्या होत्या. अवघ्या अडीच तासांत विविध वेळेच्या अंतरावर बस फेल झाल्याने ड्रायव्हर-कंडक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.सकाळच्याच सत्रात ६ बसेस फेल झाले ही योग्य नाही, यामध्ये देखभालीचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांनी या बाबत गांभिर्याने लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. - नितिन पाटील, सभापती, केडीएमटी
कल्याण-डोंबिवली मनपा परिवहनचे टायर पंक्चर!
By admin | Updated: June 16, 2015 23:38 IST