Join us
Daily Top 2Weekly Top 5

कळवा ते अंबरनाथ; फलाट तिथे टॉयलेट

By admin | Updated: June 23, 2015 00:44 IST

कळवा ते अंबरनाथ रेल्वे स्थानकांत ‘जिथे फलाट तिथे स्वच्छतागृह’ ही संकल्पना राबवण्याचा मानस असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला

अनिकेत घमंडी, डोंबिवली कळवा ते अंबरनाथ रेल्वे स्थानकांत ‘जिथे फलाट तिथे स्वच्छतागृह’ ही संकल्पना राबवण्याचा मानस असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. केंद्रिय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या रेल्वे अर्थसंकल्पीय भाषणात खासदारांनी रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी त्यांचा निधी द्यावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आणि मुलभूत गरज असलेली स्वच्छतागृहे बांधण्यासाठी खासदार निधी देण्यात येणार आहे. प्रभूंच्या आवाहनाला साद देणारे मुंबई-ठाण्यातील ते पहिले खासदार आहेत. यानुसार आठवडाभरात कळवा ते अंबरनाथ या मार्गावरील स्थानकांची पाहणी करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी जाणार आहेत. ते स्थानकांमधील सध्याच्या स्वच्छतागृहाचीही पाहणी करणार असून त्यासह या सुविधेची आवश्यकता असलेले फलाट, त्याची मुंबई-कल्याण दिशा, प्रवाशांची वर्दळ, महिलांसह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची आणि पुरुष प्रवाशांची सोय, तसेच विकलांगानाही तुलनेने सोयीस्कर अशा पद्धतीने फलाटांमधील जागांची पाहणी करावी असा सर्वकष निकष असल्याचे सांगण्यात आले.