जितेंद्र कालेकर - ठाणो
काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाने यंदा भव्य जयपूरचा महल साकारला आहे. महलाची ही भव्य कलाकृती आणि आकर्षक रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली आहे.
काजूवाडीच्या या मंडळाची 1979 मध्ये स्थापना झाली असून यंदाचे 35 वे वर्ष आहे. कला दिग्दर्शक संदीप वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील समीर भेकरे आणि अभिषेक बनकर यांच्या 2क् जणांच्या टीमने जयपूरच्या या महलाची प्रतिकृती उभारली आहे. यासाठी 1 जून ते 28 ऑगस्ट 2क्14 असे तीन महिने काम करण्यात येत होते, अशी माहिती वेंगुर्लेकर यांनी दिली. तब्बल 15 ते 16 लाखांच्या खर्चातून ही कलाकृती साकारण्यात आली असून 32 फूट उंच आणि रुंदी 3क् फूट 45 फूट लांबीच्या या भव्य मंडपात गेल्यानंतर राजस्थानच्या एखाद्या महालात आल्याचाच भास होतो. विशेष म्हणजे खड्डे विरहित मंडप उभारला आहे. वीज बचतीसाठी एलईडी दिव्यांचा मंडप आणि परिसरात वापर करण्यात आला आहे. उत्कृष्ठ रंगसंगतीची ही रोषणाई डोळयाचे अक्षरश: पारणो फेडणारी अशी आहे. अर्थात, त्यासाठी मंडळाला भरघोस अडीच लाखांचा खर्च करावा लागला आहे. एकूणच संपूर्ण कलात्मकता आणि भव्यतेमुळे सालाबादप्रमाणो मंडळाचा हा गणोश यंदाही भाविकांचे आकर्षण ठरला आहे. मंडळामध्ये महिलांसह 12क् कार्यकर्ते असून 15 पदाधिकारी आहेत.
यंदाची ही कलाकृती साकारण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीस किंवा थर्माकोलचा वापर करण्यात आलेला नाही. पर्यावरणभिमुख मंदिर उभारणीसाठी कापड, लाकूड फायबर मोल्डींचा वापर करण्यात आल्याचे संजय भागराव यांनी सांगितले.
सुरक्षिततेची खबरदारी
मंडळाने सुरक्षितसेसाठी मंडपाभोवती आतून बाहेरून सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. दोन खासगी सुरक्षा रक्षकही तैनात असून दिवसा आणि रात्री मंडळाचे प्रत्येकी दहा कार्यकत्र्याचा सतत याठिकाणी राबता ठेवण्यात आला आहे. मंडळाने अधिकृत मीटरने वीज आहे.शिस्त, भव्यता आणि कलात्मक मंडप साकारुनही इतरांना संधी मिळावी, म्हणून कोणत्याही गणोश उत्सव स्पध्रेत हे मंडळ सहभागी होत नसल्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते प्रविण पाटील यांनी दिली.
गणोशोत्सवाच्या काळात या मंडपामध्ये मंद आवाजात केवळ भक्तीगीते आणि ोक, मंत्र यालाच प्राधान्य देण्यात येते. सिनेमातील इतर गाण्यांना याठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक स्वरुप यावे आणि सर्वाना सामावून घेण्यसाठी पहिल्या दिवसापासून याठिकाणी बहुभाषिक भजने सादर करण्यात येत आहेत. मंडळातील शिस्तीचा हा एक भाग असून याठिकाणी पत्ते खेळण्यालाही बंदी आहे. भाविकांच्या रांगेत महिलांना प्राधान्य असते.
काजूवाडीचा राजा : मंडळाची यंदाची 11.5 फूट उंचीची सुबक गणोश मूर्ती आहे. तिच्यावरील डायमंडच्या दागिन्यांमुळे ती आणखीनच मनमोहक दिसते. काजूवाडीचा हा बाप्पा नवसाला पावतो, अशी अख्यायिका असल्यामुळे सोन्याची माळ, चांदीचे मोदक, मोत्यांची माळ, चांदीचे मोदक आणि जास्वंदीचे फूल भाविकांनी अर्पण केले आहेत. नारळाच्या तोरणाचा नवस बोलण्याचीही प्रथा येथे आहे. त्यामुळेच त्याची ‘काजूवाडीचा राजा’ अशीही ख्याती आहे.