ठाणे : उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी या भाजपात प्रवेश करण्याच्या तयारी असल्याची जोरदार चर्चा आज दिवसभर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली. परंतु जर का त्यांनी भाजपात प्रवेश केला तर माजी आमदार कुमार आयलानी यांच्या उल्हासनगरमधील राजकारणाला पूर्णविराम मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पप्पू कलानी यांच्या पत्नी असलेल्या ज्योती यांनी भाजपाचे कडवे आव्हान धुडकाऊन उल्हासनगरमध्ये पुन्हा विजय मिळवला. पण पक्षाच्या राज्य पातळीवरील बैठकांमध्ये त्यांना विचारात घेतले जात नाही. यामुळे संतापलेल्या ज्योती या कार्यकर्त्यांसह भाजपात जाण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरू असल्याची चर्चा दिवसभर जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक भाजपात जाण्याची तयारी जवळजवळ पूर्णत्वास आली आहे. त्यांच्याबरोबर ज्योतीदेखील भाजपाच्या उंबरठ्यावर दिसून येत आहेत. आतापर्यंत नाईकांच्या नावाची चर्चा असतानाच आज ज्योती यांचे नावही चर्चेत आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)भाजपा प्रवेशाच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, ‘नहीं नहीं, मैं ऐसी नहीं करूंगी़ ऐसी कोई बात ही नहीं’ असे हसण्याच्या स्वरात सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.
ज्योती कलानींच्या भाजपा प्रवेशाची चर्चा!
By admin | Updated: December 21, 2014 01:48 IST