Join us  

पावसाळ्यात गुरांना भिजत ठेवणाऱ्या ज्येष्ठाला कारावास, दंडाधिका-यांनी ठोठावली शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:36 AM

गुरांना तब्बल पाच दिवस पावसात भिजत ठेवणा-या ७५ वर्षीय नागरिकाला मुंबई दंडाधिकाºयांनी गेल्याच आठवड्यात १० दिवसांचा कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मुंबई : गुरांना तब्बल पाच दिवस पावसात भिजत ठेवणा-या ७५ वर्षीय नागरिकाला मुंबई दंडाधिकाºयांनी गेल्याच आठवड्यात १० दिवसांचा कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.लालबागचे रहिवासी असलेले गोपाळ फुलसुंगे यांनी २०१३मध्ये २८ गुरांना पाच दिवस पावसात भिजत ठेवले. त्यांना साधी हलायलाही जागा मिळणात नाही, एवढ्या अरुंद जागेत कोंडून ठेवले. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मुंबई दंडाधिकाºयांनी गेल्याच आठवड्यात गोपाळ यांना दहा दिवसांचा कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.गुरांना अशा प्रकारे पावसात भिजत ठेवल्याने त्यांच्या तब्येतीवर हवामानाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शेड न टाकताच गुरांना मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. सरकारी वकिलांनी गोपाळ राहात असलेल्या परिसरातीलच एका रहिवाशाला साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर केले. साक्षीदाराने गोपाळ यांनी जनावरांना पावसाळ्यात गुरांना पदपथावर बांधून ठेवल्याचे दंडाधिकाºयांना सांगितले. मात्र, गोपाळ त्यांच्या गुरांची योग्य काळजी घेत असल्याचेही दंडाधिकाºयांना सांगितले.आरोपीने पावसाळ्यात गुरांना राहण्यासाठी योग्य ती सोय करायला हवी होती, असे म्हणत दंडाधिकाºयांनी गोपाळ यांना शिक्ष ठोठावली.

टॅग्स :तुरुंग