ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - ग्रॅमी पुरस्कार विजेता आणि प्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बिबरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. येत्या मे महिन्यात ‘परपज वर्ल्ड टूर’साठी जस्टीन बिबर भारतात येणार असून नवी मुंबईत त्याचा कार्यक्रम होणार आहे.
व्हाईट फॉक्स इंडियाचे संचालक आणि ‘परपज वर्ल्ड टूर’चे प्रवक्ते अर्जुन जैन यांनी सांगितले की, जस्टीन बिबर लोकप्रिय पॉपस्टार आहे. त्याची सुरू असलेली ‘परपज वर्ल्ड टूर’ जगभर गाजत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये १० मे रोजी त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘व्हेअर आर अेस नाऊ’, ‘बॉयफ्रेंड’, ‘अॅज लाँग अॅज यू लव्ह मी’, ‘व्हाट डू यू मीन’, ‘बेबी’ आणि ‘परपज’ ही गाजलेली गाणी जस्टीन बिबर सादर करेल.
दरम्यान, जस्टीन बिबरचे भारतात खूप मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत. २२ फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू होणार आहे.