Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्या. कोदे आता निवृत्तीनंतर रुपेरी पडद्यावर

By admin | Updated: June 8, 2015 02:47 IST

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अभिनेता संजय दत्तला शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश अशी ओळख असलेले न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी निवृत्तीनंतरही रुपेरी पडद्यावर न्यायाधीशाची भूमिका साकारणार आहेत.

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अभिनेता संजय दत्तला शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश अशी ओळख असलेले न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी निवृत्तीनंतरही रुपेरी पडद्यावर न्यायाधीशाची भूमिका वठवून न्यायक्षेत्राशी ३० वर्षांहून अधिक काळ जुळलेली आपली नाळ कायम ठेवली आहे.विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुमारे दहा वर्षे बॉम्बस्फोट खटला चालविल्यानंतर सहा वर्षे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहूनचे न्या. कोदे काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत. हत्या झालेले ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या जीवनावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले असून त्यातील न्यायालयीन दृष्यांत न्यायाधीशाची भूमिका खुद्द न्या.कोदे यांनी साकारली आहे. स्वत: पत्रकार असलेले तरुण पत्रकार शालेंद्र पांडे या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक आहेत. प्रत्यक्ष जीवनात न्यायाधीशपदाचा झगा उतरवून ठेवल्यानंतर रुपेरी पडद्यावर तोच झगा पुन्हा परिधान करण्यामागची आपली भूमिका न्या. कोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. पत्रकारिता आणि न्यायालयीन व्यवस्थेतील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होण्याचा आपल्याला आनंद आहे, असे न्या. कोदे म्हणाले.