मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संभाजीराव म्हसे, तर तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह अन्य सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. चंद्रशेखर भगवंतराव देशपांडे (अमरावती), प्रा. डॉ. राजाभाऊ नारायण करपे (औरंगाबाद), डॉ. भूषण वसंतराव कर्डिले (नाशिक), डॉ. दत्तात्रेय दगडू बाळसराफ (पुणे), डॉ. सुवर्णा तुकाराम रावळ (मुंबई), डॉ. प्रमोद गोविंदराव येवले (नागपूर) अशी आयोगाच्या अन्य सदस्यांची नावे आहेत.
मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. म्हसे
By admin | Updated: January 5, 2017 05:13 IST