Join us  

न्या. भूषण धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 3:28 AM

न्या. प्रदीप नंद्राजोग यांच्या निवृत्तीनंतर व न्या. एस. सी. धर्माधिकारी यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी यांची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग निवृत्त झाल्यानंतर उच्च न्यायालयाने दुसरे ज्येष्ठ न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून सोमवारी नियुक्ती केली.न्या. प्रदीप नंद्राजोग यांच्या निवृत्तीनंतर व न्या. एस. सी. धर्माधिकारी यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी यांची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्या. नंद्राजोग यांच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दुसरे ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून न्या. एस. सी. धर्माधिकारी होते. मात्र, त्यांची अन्य राज्यांतील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणाने अन्य राज्यात जाणे शक्य नसल्याचे म्हणत थेट राजीनामाच दिला.त्यामुळे तिसरे व न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या निवृत्तीनंतर उच्च न्यायालयाचे दुसरे ज्येष्ठ न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी आहेत. त्यांचे वडील प्रद्युम्न धर्माधिकारी हेही वकिली व्यवसायात होते. तर न्या. एस. सी. धर्माधिकारी यांचे ते चुलत बंधू आहेत. येत्या एप्रिल महिन्यात न्या. भूषण धर्माधिकारी निवृत्त होणार आहेत.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट