Join us  

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. भूषण धर्माधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 2:40 PM

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने आज नियुक्तीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध जाहीर केली.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग हे २३ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले.अ‍ॅड. घारे यांची शहर दिवाणी न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे वकिली केली. 

मुंबई - मुंबईउच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी न्या. भूषण धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने आज नियुक्तीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध जाहीर केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग हे २३ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची अधिसूचना मंत्रालयाने २४ फेब्रुवारीला जारी केली होती. आज केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली. न्या. भूषण धर्माधिकारी यांचा जन्म २८ एप्रिल १९५८ ला झाला. त्यांचे शिक्षण बी.एस्सी. एलएलबी इतके झाले आहे. १९८० मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून विधि अभ्यासक्रमाची पदवी घेतली. त्यानंतर अ‍ॅड. वाय.एस. धर्माधिकारी यांच्यासह मध्यप्रदेशातील जबलपूर येथे वकिलीला सुरुवात केली. १९८४ ला ते नागपुरात परतले व अ‍ॅड. एस.एस. घारे यांच्या मार्गदर्शनात वकिलीस प्रारंभ केला. अ‍ॅड. घारे यांची शहर दिवाणी न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे वकिली केली. 

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबईवकिल