Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपण्यास थोडाच अवधी, तरी परवानगीची प्रतीक्षा

By admin | Updated: February 18, 2017 06:48 IST

निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावण्यास थोडाच अवधी उरला आहे. मात्र प्रचार परवानगीच्या थंड कारभारामुळे काही

मुंबई : निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावण्यास थोडाच अवधी उरला आहे. मात्र प्रचार परवानगीच्या थंड कारभारामुळे काही उमेदवारांना प्रचार थोडक्यात आटपावा लागला. तर काहींना परवानगीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.निवडणुकीच्या काळात संपर्क कार्यालय, प्रचार सभा, पदयात्रा, प्रचारासाठी लागणारी वाहने अशा अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. या परवानग्या घेण्यासाठी पालिका कार्यालयात एक खिडकी योजना राबवण्यात आली. अशीच एक खिडकी योजना घाटकोपर येथील एन विभाग कार्यालयात सुरू करण्यात आली. मात्र या ठिकाणी परवानगी घेण्यास सकाळी अर्ज केल्यावर परवानगीसाठी कार्यकर्त्यांचा पूर्ण दिवस वाया जात आहे. (प्रतिनिधी)