Join us
Daily Top 2Weekly Top 5

रागावलेल्या आजीची नदीत उडी

By admin | Updated: June 28, 2017 03:44 IST

एका आजीबार्इंचे घरात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या रागात त्यांनी दहिसरच्या मिठी नदीत उडी मारल्याचा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका आजीबार्इंचे घरात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या रागात त्यांनी दहिसरच्या मिठी नदीत उडी मारल्याचा प्रकार घडला. मात्र एमएचबी पोलिसांनी वेळीच धाव घेत आजीबार्इंना वाचविले आहे. महानंदा बुटले (७३) या दहिसरच्या यशवंत तावडे रोडवर राहतात. कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या बुटले यांचे २७ जून रोजी त्यांच्या घरच्यांशी भांडण झाले. त्या रागात त्यांनी मिठी नदीमध्ये उडी घेतली. ही बाब स्थानिकांनी पाहताच पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बुटले आजीबार्इंना बाहेर काढले. मंगळवारी सकाळी पावसाला जोर असल्याने या नदीचा वेग अधिक होता. आजींना वेळेत बाहेर काढले नसते तर पाण्यात बुडून त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती. आजींना स्थानिक करुणा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.