Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला जुलैचा मुहूर्त

By admin | Updated: June 9, 2014 02:15 IST

मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना जवळच शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी विद्यापीठाने ठाणे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना जवळच शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी विद्यापीठाने ठाणे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले असून, येथे जुलैपासून विधी आणि एमएमएस इंटिग्रेडेट हे पाच वर्षे मुदतीचे पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. या अभ्यासक्रमांचा आराखडा तयार झाला असून, त्याला विद्यापीठाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ठाणे उपकेंद्रात विधी महाविद्यालय सुरू होणार आहे.विद्यापीठाचे पहिले विधी महाविद्यालय आणि एमएमएस इंटिग्रेटेड पदवी अभ्यासक्रम येथे सुरू होेणार आहे. पाच वर्षे मुदतीच्या या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ६0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. विधी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार झाला असून, याला शनिवारी विद्वत परिषदेत मान्यता दिली आहे. विद्यापीठाच्या इतर प्राधिकरणाकडून अभ्यासक्रमाला मान्यता मिळताच हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर हे अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. ठाणे उपकेंद्रामुळे मुंबई उपनगर आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. विधी अभ्यासक्रमाचा आराखडा विद्वत परिषदेत मंजूर केला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात ठाणे उपकेंद्रात विधी अभ्यासक्रम सुरू होईल, असे मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि सिनेट सदस्य महादेव जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)