Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसावर हल्ला करणाऱ्यास न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 07:10 IST

एका महिला पोलिसासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कुरार पोलीस ठाण्यात केलेल्या मारहाणीप्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात

मुंबई : एका महिला पोलिसासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कुरार पोलीस ठाण्यात केलेल्या मारहाणीप्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.मंगल संतोष यादव (३६) असे या आरोपीचे नाव असून, त्याला कुरार पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली होती. त्याने महिला पोलिसाच्या श्रीमुखात भडकावले होते तसेच दोघांना मारहाण केली होती. त्याला न्यायालयाने १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कुरार पोलिसांनी दिली. दारूच्या नशेत यादवने शेजाऱ्यांना शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले होते. (प्रतिनिधी)