Join us

लैंगिक छळप्रकरणी न्यायाधीशाला नोटीस

By admin | Updated: August 30, 2014 03:07 IST

महिला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशाच्या लैंगिक छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर नोटीस बजावली आहे

नवी दिल्ली : महिला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशाच्या लैंगिक छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर नोटीस बजावली आहे. या महिला न्यायाधीशाने नंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.न्या. जे.एस. खेहड यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठाने या माजी महिला न्यायाधीशाच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्थापन केलेल्या तपास समितीचे कामकाजही रोखले आहे. याचसोबत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलकडूनही खुलासा मागवला आहे.या दरम्यान ८ आॅगस्ट रोजी दिलेल्या आदेशाला रोखले जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.ग्वाल्हेरच्या माजी न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत तपास समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या माजी महिला न्यायाधीशांच्या मागणीनुसार, त्यांच्या तक्रारीचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दोन प्रमुख न्यायाधीश व एक अन्य न्यायाधीश यांची समिती स्थापन केली जावी. आपला राजीनामा हा रचनात्मक शेवट असून त्यांना सर्व फायदे दिले जावेत, अशी मागणी त्यांनी पुढे केली आहे.याआधी या महिला न्यायाधीशाने तपासादरम्यान आपल्या पतीला व मुलीला तेथे हजर राहण्यासाठी जारी केलेल्या समन्सवरही हरकत घेतली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)