मुंबई : शाळेच्या फी वाढी विरोधातील पालकांच्या आंदोलनाबाबत संस्थाचालकाची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या दोघा पत्रकारांना चक्क काहीकाळ खोलीत डांबून ठेवण्याचा प्रकार मंगळवारी घडला. विक्रोळी येथील अभय इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही घटना घडली. मात्र त्यांचे गांभीर्य लक्षात येताच चालकांनी दोघाची सुटका करुन माफीनामा मागित लोटांगण घातले.अभय इंटरनॅशनल शाळेत फी वाढीविरोधात पालकांचे सुरू असलेले आंदोलन कव्हर करण्यासाठी दोन मराठी वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी गेले होते. पालकांची मागणी समजून घेतल्यानंतर ते शाळाचालकांची भूमिका जाणून घेण्यासाठी शाळेत गेले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी एका खोलीत बराच वेळ बसवून ठेवले. त्यानंतर दरवाजा बाहेरुन बंद केला. या प्रकाराची कल्पना येताच त्यांनी अन्य पत्रकार व पोलिसांना त्याबाबत कळविले. अन्य पत्रकार त्याठिकाणी आल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांना सोडून दिले. (प्रतिनिधी)
फी वाढीबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांना कोंडले
By admin | Updated: June 15, 2016 04:22 IST