अलिबाग : पत्रकारांनी पत्रकारिता करताना प्रसन्न शैलीतून, निर्भीडपणे, श्रध्दा व निष्ठेने लिखाण करुन जनमानसात आपला ठसा उमटवावा, आपल्या लेखणीची धार वाढविली तर समाजासाठी आपल्या लेखणीचा उपयोग होईल म्हणून पेटती वात तेवत ठेवून पत्रकारिता करावी, यासाठी पत्रकाराच्या मनात कृतज्ञतेची भावना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत जोशी यांनी मंगळवारी येथे बोलताना केले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना. पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात जोशी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे पत्रकार प्रशांत डिंगनकर यांना ज्येष्ठ साहित्यिक राजा राजवाडे पुरस्कार आ. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर महाडचे पत्रकार निलेश पवार यांना ज्येष्ठ पत्रकार म.ना. पाटील स्मृती पुरस्कार व श्रीवर्धनचे छायाचित्रकार प्रसाद नाझरे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला अलिबागचे आमदार सुभाष पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक द्वारकानाथ नाईक, पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य द.कृ.वैरागी आदी उपस्थित होते. आमदार पंडितशेठ पाटील यांचा यावेळी पत्रकार संघाच्या वतीने जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले, पत्रकार संघातर्फे माझा सत्कार होत आहे हे माझे भाग्य समजतो. विकासाचा समतोल साधण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवून हाती असलेल्या लेखणीचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा असा सल्ला त्यांनी दिला.गतिमंद विद्यालयात पत्रकार दिन साजराच्पनवेल : उपेक्षित, शारीरिकदृष्ट्या विकलांग त्याचबरोबर मागासलेल्या घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार करतात. ही भूमिका सातत्याने बजावणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या सदस्यांनी मंगळवारी कोप्रोली येथील निवासी कर्णबधीर आणि मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर पत्रकार दिन साजरा केला. यानिमित्ताने येथील विद्यार्थ्यांबरोबर हितगुज, गप्पागोष्टी करीत सर्वांना आपले केले.
पत्रकारांमध्ये कृतज्ञता आवश्यक
By admin | Updated: January 6, 2015 22:07 IST