Join us

जोगेश्वरीत पालिका अधिका-याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:38 IST

पालिकेचे के पूर्वचे साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावरील हल्ला प्रकरण ताजे असतानाच, याच विभागातील एका अधिका-याला शुक्रवारी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. सोनावणे असे या जखमी अधिकाºयाचे नाव आहे.

मुंबई : पालिकेचे के पूर्वचे साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावरील हल्ला प्रकरण ताजे असतानाच, याच विभागातील एका अधिका-याला शुक्रवारी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. सोनावणे असे या जखमी अधिकाºयाचे नाव आहे.मेघवाडी येथील श्रमिक शाळेच्या मागील परिसरात एक मजली घराच्या भिंतीची डागडुजी सुरू होती. त्या वेळी सोनावणे आणि त्यांचे एक सहकारी या ठिकाणी गेले आणि त्यांनी बांधकामाची चौकशी केली. तेव्हा घरमालक घरी नव्हते. त्यामुळे घराशेजारी राहणारे शाखाप्रमुख सुभाष मांजरेकर त्या ठिकाणी गेले. त्यांनी सोनावणे यांना बांधकामाची माहिती दिली.मात्र याच दरम्यान या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा पालिका अधिकाºयांनी पूर्ण घरावरच हातोडा फिरवला. तेव्हा मांजरेकर आणि काही कार्यकर्ते यांची पालिका अधिकाºयांसोबत हाणामारी झाली. याबाबत स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. या हाणामारीत जखमी झालेले सोनावणे तसेच एका शिवसैनिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिका अधिकाºयाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एसीपी मिलिंद खेतले यांनी दिली.यापूर्वी बुधवारी के पूर्वचे साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर तोडक कारवाई दरम्यान हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली.