Join us

जिंदाल स्टील फाउंडेशनकडून अंगणवाड्यांना साहित्य

By admin | Updated: March 29, 2015 22:35 IST

जव्हार तालुक्यातील १३६ अंगणवाड्यांना जिंदाल स्टील फाऊंडेशनकडून विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा

जव्हार : जव्हार तालुक्यातील १३६ अंगणवाड्यांना जिंदाल स्टील फाऊंडेशनकडून विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा थेतले या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पालघर हे होते. जव्हार तालुक्यातील आदिवासी बालकांना या सुविधांचा लाभ मिळावा हा या मागचा हेतू होता. स्टेडिओमीटर १०० संच, इंन्फटोमीटर १०० संच आणि वजन काटे ६८ संच यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत सेन (सीईओ, जेएसडब्ल्यू), ज्योती भोये (सभापती पं. स. जव्हार), पागी (उपसभापती, पं. स. जव्हार), शेखर सावंत (गटविकास अधिकारी, जव्हार), राकेश शर्मा (एम.डी. जेएसडब्ल्यू) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी, जव्हार यांनी केले. (वार्ताहर)