Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिग्नेश शहाला हायकोर्टात जामीन मंजूर

By admin | Updated: August 23, 2014 01:33 IST

सुमारे पाच हजार कोटी रूपयांच्या नॅशनल स्पॉट एक्सेंच घोटाळ्यातील आरोपी जिग्नेश शहाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी पाच लाखांचा जामीन मंजूर केला़

मुंबई : सुमारे पाच हजार कोटी रूपयांच्या नॅशनल स्पॉट एक्सेंच घोटाळ्यातील आरोपी जिग्नेश शहाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी पाच लाखांचा जामीन मंजूर केला़
अटक झाल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी शहाला जामीन मंजूर झाला आह़े दर सोमवारी व गुरूवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावणो, पुराव्यांशी छेडछाड न करणो या अटींवर न्या़ अभय टिपसे यांनी हा जामीन मंजूर केला़ हजारो गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी एक्सचेंजचे संचालक शहा यांना 7 मे 2क्14 रोजी अटक झाली़ जून महिन्यात सत्र न्यायालयाने शहा यांचा जामीन अर्ज फेटाळला़ यासाठी शहा यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावल़े न्या़ टिपसे यांच्यासमोर ही सुनावणी झाली़ (प्रतिनिधी)