Join us

जिया खानप्रकरणी सीबीआयतर्फे आरोपपत्र दाखल

By admin | Updated: December 10, 2015 02:35 IST

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने बुधवारी नवोदित अभिनेता सूरज पांचोलीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने, सरकारही आश्चर्यचकित झाले आहे.

मुंबई: अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने बुधवारी नवोदित अभिनेता सूरज पांचोलीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने, सरकारही आश्चर्यचकित झाले आहे.जिया खान (२५) हिच्या आत्महत्येचा तपास कुठवर आला, अशी विचारणा पंधरा दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने सीबीआयकडे केली होती. त्यानंतर बुधवारी अचानक सीबीआयने अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री झरिना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने, या केसमधील विशेष सरकारी वकील दिनेश तिवारी यांनी आश्चर्य व्यक्त केले. अ‍ॅड. तिवारी यांनी उच्च न्यायालयात जियाची आई राबिया खान यांच्यातर्फे केस लढवली आहे. त्यामुळे सीबीआयने जिया खानने आत्महत्या केल्याचे आरोपपत्रात म्हटले असेल, तर त्याला आव्हान देण्यात येईल, असेही अ‍ॅड. तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले.