बोईसर : बोईसर-तारापूर व प्रमुख रस्त्यालगत असलेले मधुबन ज्वेलर्सचे दुकान बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी फोडले. या दुकानांमधील सोन्याचे दागिने, चांदी, इमिटेशन ज्वेलरी आणि रोख रक्कम असे मिळून सुमारे १९ लाख ८० हजाराचा ऐवज चोरून नेला. तर चित्रालय टॉकीजच्या सीसीटीव्ही कमे-यात चोरी करतानाचे संपुर्ण चित्रिकरण झाले आहे. त्यामुळे चोरांना पकडणे पोलीसांना सहज शक्य होणार आहे.मधुबन ज्वेलर्स दुकानाच्या मागच्या बाजुची खिडकी व लोखंडी ग्रील तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केला. चार लाख पाच हजार रू. किंमतीचे सोन्याचे दागिने, पंधरा लाख चाळीस हजार रू. ची चांदी त्यामध्ये ३८ किलो ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने २ किलो ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के ३ वस्तू, पंधरा हजार रु. किमतीचे सोन्याच्या इमिटेशन ज्वेलर्स (बॅन्टेक्स) आणि वीस हजार रू. रोख अशी सर्व मिळून १९ लाख ८० हजार रू. च्या मालाची चोरी करण्यात आली आहे.चित्रालय टॉकीजच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रथम चित्रालय टॉकीजमधील बुकींग आॅफिसमधील कपाट तोडताना चोर दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले तर सीसीटीव्हीचे फुटेजपाहून मधुबन ज्वेलर्सचे दुकान मालक बाबुलाल जैन यांनी संशयीत चार चोरांपैकी एकाचे नाव बोईसर पोलीसांनी सांगितले.
ज्वेलर्सचे दुकान फोडले
By admin | Updated: October 23, 2014 23:57 IST