Join us  

ज्वेलरी क्षेत्रात चांगले कारागीर हवे - अमृता फडणवीस; जेम्स अँड ज्वेलरीच्या नव्या इन्स्टिट्यूटचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 1:24 AM

जीजेईपीसी इंडियाने जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात चांगले पाऊल उचलले आहे. देशाला सर्वांत जास्त परदेशी चलन हे जेम्स अँड ज्वेलरीमधून मिळत आहे. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप मोठा वाटा हा जेम्स अँड ज्वेलरीचा आहे.

मुंबई : जीजेईपीसी इंडियाने जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात चांगले पाऊल उचलले आहे. देशाला सर्वांत जास्त परदेशी चलन हे जेम्स अँड ज्वेलरीमधून मिळत आहे. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप मोठा वाटा हा जेम्स अँड ज्वेलरीचा आहे. जीडीपीमध्येदेखील ७ टक्के योगदान जेम्स अँड ज्वेलरीचे आहे. त्यामुळे चांगली कौशल्ये असलेले कारागीर या क्षेत्राला हवे आहेत. नव्याने सुरू झालेल्या इन्स्टिट्यूटमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे चांगले शिक्षण घेऊन कुशल कारागीर बाहेर पडतील. देशाचे उत्तम भवितव्य डोळ्यासमोर ठेवून नवीन इन्स्टिट्यूटची सुरुवात करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.जीजेईपीसी इंडिया आणि आयआयजीजे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, उद्घाटन समारंभ आणि वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू स्किल डेव्हलपमेंट सेंटर आॅफ द इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जेम्स अँड ज्वेलरीचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. हा सोहळा अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी येथील आयआयजीजे इन्स्टिट्यूट येथे शनिवारी सकाळी ११ वाजता पार पडला. या प्रसंगी पोपले ग्रुपचे संचालक राजीव पोपले, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष कोलीन शाह, आयआयजीचे अध्यक्ष किरीट भन्साली आणि आयआयजीजेचे संचालक प्रवीण पंड्या उपस्थित होते.अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘देशाला जीजेईपीसीचे उत्तम योगदान मिळत आहेत. देशभरात सहा इन्स्टिट्यूटमधून आतापर्यंत १० हजारांहून जास्त विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करून, या क्षेत्रात नाव लौकिक मिळवित आहेत. जीजेईपीसीने चांगले कौशल्य आणि हुशार विद्यार्थीं घडविले आहेत. इन्स्टिट्यूटने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून, ज्वेलरीमधील डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग यावर जास्त भर दिला आहे. मेक इन इंडियालाही याचा हातभार लागत आहे. नव्याने सुरू केलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये विशिष्ट कौशल्य पद्धतीचे कोर्सेस घेतले जाणार आहेत. क्वॉलिफिकेशन अ‍ॅक्ट आणि नॅशनल आॅक्युपेशनल सँटर्ड कोर्स घेतले जातील. जेम्स अँड ज्वेलरी या क्षेत्रात नवोदित विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी कोर्सेस असणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुसज्ज अशी नवीन इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आली आहे.ज्वेलरीच्या कलाकृतींचा अविष्कारबी. ए. जेम्स अँड ज्वेलरी या तीन वर्षीय कोर्सच्या विद्यार्थ्यांनी ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेवर ‘टिकाऊ व पुनरुज्जीवन’ कलाकृतीचे एकदिवशीय प्रदर्शन भरविले होते. टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा वापर हा ज्वेलरीमध्ये कशा प्रकारे केला जाऊ शकतो, याचे उत्तम नमुने प्रदर्शनात मांडण्यात आले.

टॅग्स :अमृता फडणवीसमुंबई