Join us  

'पैसे नाहीत तर कामही नाही', जेट एअरवेजच्या वैमानिकांचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:50 PM

आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने जेटचे कर्मचारी हवालदील झाले आहेत.

ठळक मुद्देआर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने जेटचे कर्मचारी हवालदील झाले आहेत. कंपनीच्या सुमारे 1 हजार वैमानिकांनी एक एप्रिलपासून विमानांचे उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांकडून मदत मिळवण्यात अपयश आल्यानंतर वैमानिकांनी हा निर्णय घेतल्याने कंपनीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मुंबई - आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने जेटचे कर्मचारी हवालदील झाले आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती बिघडललेली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे घर कसे चालवायचे या विवंचनेत जेटचे कर्मचारी पडले आहेत. कंपनीच्या सुमारे 1 हजार वैमानिकांनी एक एप्रिलपासून विमानांचे उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बँकांकडून मदत मिळवण्यात अपयश आल्यानंतर वैमानिकांनी हा निर्णय घेतल्याने कंपनीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. जेट एअरवेजच्या जवळपास 1100 वैमानिकांच्या प्रतिनिधीत्त्वाचा दावा करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संस्थेने 31 मार्चपर्यंत थकित वेतन न दिल्यास, तसेच पुनर्जीवन योजनेची स्थिती स्पष्ट न झाल्यास 1 एप्रिलपासून एकही विमान उडणार नाही, अशी घोषणा गेल्याच आठवड्यात केली होती. यानंतर काही दिवसांत कर्जातून बाहेर येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत एअरलाइन्सचे व्यवस्थापन एसबीआय बँकेच्या हाती गेले होते. दरम्यान, नरेश गोयल यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे कंपनीच्या वाटेतील अडथळे दूर होतील अशी शक्यता नाही. 

जेटचे कर्मचारी हवालदील; संकटाची मालिका संपेनाजेटच्या कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नसल्याने वैमानिक, तंत्रज्ञ व केबिन क्रू सहित सर्व विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कंपनीचे भवितव्य अधांतरी असल्याने भविष्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे. काही वैमानिक मध्यंतरी दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी मुलाखती देऊन आले मात्र इतर कर्मचाऱ्यांना विमान वाहतूक क्षेत्रात सध्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने त्यांना कंपनी बंद पडल्यास आपल्या रोजगाराचे काय होईल हा प्रश्न पडला आहे.

जेट एअरवेजच्या दुखण्याने सर्वांची अडचणकंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी घर, वाहन खरेदी साठी मोठे कर्ज घेतले आहे. वेतनाचा मोठा हिस्सा या कजार्ची परतफेड करण्यासाठी खर्च होतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन होत नसल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ज्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात बचत केलेली होती त्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवस्था करण्यासाठी बचत खात्यातून पैसे काढण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र जे नवीन कर्मचारी होते व ज्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात बचत नव्हती त्यांना आपल्या नातेवाईक व मित्रांकडून उधार घेण्याची वेळ आली आहे. नवरा बायको दोन्ही कमावत्या व्यक्ती एकाच कंपनीत असल्याने व वेतन होत नसल्याने अशा कुटुंबांना तर मोठा आर्थिक धक्का बसला आहे. कंपनीने या परिस्थितीतून लवकर बाहेर पडावे व पूर्वीप्रमाणे कारभार सुरळीत व्हावा अशी प्रार्थना केली जात आहे. आर्थिक कोंडीतून बाहेर निघण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून करण्यात येत आहे. 

टॅग्स :जेट एअरवेजसंप