Join us  

जेट एअरवेजप्रकरणी पंतप्रधानांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:55 AM

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा रोजगार वाचवण्यासाठी तसेच या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी निवडणुकीनंतर पंतप्रधानांना भेटून चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

मुंबई : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा रोजगार वाचवण्यासाठी तसेच या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी निवडणुकीनंतर पंतप्रधानांना भेटून चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.आॅल इंडिया जेट एअरवेज आॅफिसर्स अ‍ॅण्ड स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांनी शुक्रवारी गडकरी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्या वेळी हे आश्वासन देण्यात आल्याची माहिती पावसकर यांनी दिली.गडकरी यांच्यासमोर जेटच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाºया समस्या मांडण्यात आल्या. कर्मचाºयांच्या स्थितीबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले. याबाबत मार्ग काढण्यासाठी व ‘जेट’च्या कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित मंत्री व पंतप्रधानांना भेटून प्रयत्न करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली आहे. जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने जेटचे सुमारे २२ हजार कर्मचारी रस्त्यावर आले असून त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी सतावत आहे. कर्मचाºयांनी आतापर्यंत दाखवलेली एकता अशीच कायम ठेवावी, असे आवाहन पावसकर यांनी केले आहे.>‘वेतन मिळेपर्यंत वाहने सोडणार नाही’जेटचे काम बंद झाल्याने जेटच्या वैमानिक व केबिन क्रूच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाºया सुमारे १५० खासगी वाहनांचा वापर बंद झाला आहे. या वाहनांचे चालक म्हणून काम करणाºयांना दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे वेतन मिळेपर्यंत या वाहनांचा ताबा सोडणार नसल्याचा इशारा या चालकांनी दिला आहे. सध्या ही वाहने विमानतळाच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात आली आहेत. स्पाइसजेटने आतापर्यंत जेटच्या १०० वैमानिक, २०० केबिन क्रू, २०० तंत्रज्ञ व ग्राउंड कर्मचाºयांना कंपनीने रोजगार दिला आहे. सोबतच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई-दिल्ली अशा१६ नवीन विमानसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. अनेक विमानांचा समावेश स्पाइसजेटमध्ये करण्यात येईल. प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पाइसजेटचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी केला आहे.

टॅग्स :नितीन गडकरीजेट एअरवेज