Join us

जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:07 IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.राज्य ...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे बैठक अर्धवट सोडून ते रुग्णालयाकडे रवाना झाले. जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून थेट ब्रीच कँडी रुग्णालय गाठल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी टि्वट करत प्रकृती उत्तम असल्याचा खुलासा केला. ‘माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,’ असे जयंत पाटील यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.