Join us

जयकुमार श्रीनिवासन संचालकपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:00 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) संचालक (वित्त)पदी जयकुमार श्रीनिवासन यांची थेट निवडभरतीत गुणवत्तेवर निवड करण्यात आली असून त्यांनी नुकतीच या पदाची सूत्रे सांभाळली आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) संचालक (वित्त)पदी जयकुमार श्रीनिवासन यांची थेट निवडभरतीत गुणवत्तेवर निवड करण्यात आली असून त्यांनी नुकतीच या पदाची सूत्रे सांभाळली आहेत.जयकुमार श्रीनिवासन यांनी नागपूर विद्यापीठातून बी.कॉम. पदवी व त्यानंतर आयसीडब्ल्यूए पूर्ण केले आहे. त्यांनी जून-२०१४ ते जुलै-२०१७ यादरम्यान महानिर्मिती कंपनीचे संचालक (वित्त) या पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली असून आॅगस्ट-२०१७पासून एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक (वित्त) म्हणून ते काम सांभाळत होते. याशिवाय महागुज कॉलेरी कंपनी, यूसीएम कोल कंपनी, धोपवे कोस्टल पॉवर, महागाम इत्यादी कंपन्यांत त्यांनी अर्धवेळ संचालक म्हणून काम पाहिले आहे. महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या यशस्वी कार्यान्वयात श्रीनिवासन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली असून महानिर्मितीत सॅप प्रणालीच्या अंमलबजावणीतही त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे.