Join us
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार अर्बन बँकेची निवडणूक २९ जुलैला

By admin | Updated: July 3, 2015 22:28 IST

आदिवासी ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दी जव्हार अर्बन को-आॅप. बँकेची २९ जुलैला निवडणूक होणार असून ३० जुलै रोजी निकाल जाहीर होईल.

विक्रमगड : आदिवासी ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दी जव्हार अर्बन को-आॅप. बँकेची २९ जुलैला निवडणूक होणार असून ३० जुलै रोजी निकाल जाहीर होईल. या बँकेसाठी १७ संचालक निवडून येतील. त्यात सर्वसाधारण १२, अनुसूचित जाती-जमाती १, महिला २, इतर मागासवर्गीय १, भटक्या विमुक्त १ आदी गटांचा समावेश आहे. या वेळेस भाजपा-सेना युती होण्याचे संकेत आहेत. या बँकेस ६६ वर्षांची जुनी परंपरा आहे. प्रत्यक्ष निवडणूक २९ जुलैला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होऊन ३० जुलैला निकाल जाहीर होऊन १०,५८८ सभासद संचालकांचे भवितव्य ठरविणार आहेत.जव्हार अर्बन बँक कोअर बँक असून बँकेच्या शाखांचा विस्तार भरपूर होत आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील छोट्यामोठ्या धंदेवाइकांची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी असल्याने विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा तालुक्यांतील ही महत्त्वाची बँक असल्याने या बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच अधिक लक्ष आहे. ही निवडणूक अटीतटीची होणार असून सर्वच पक्ष आपली प्रतिष्ठा पणाला लावतील, असे चित्र आहे. (वार्ताहर)