Join us

जिनेस पेन्ट कंपनी खाक

By admin | Updated: April 24, 2015 23:16 IST

तालुक्यातील दिनकरपाडा येथील जिनेस पेन्ट या रंगाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागून ही कंपनी

वाडा : तालुक्यातील दिनकरपाडा येथील जिनेस पेन्ट या रंगाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागून ही कंपनी खाक झाली असून एक कामगार होरपळला. प्रथम इथेनच्या टँकरला आग लागली त्यानंतर ती कंपनीभर पसरली. अग्निशमन दलाच्या पथकाने तब्बल दोन तास अथक परिश्रम करून ती विझवली.या कंपनीत इथेनने भरलेला टँकर खाली करण्यात येत असताना आग लागली. तिने टँकरला व त्यानंतर कंपनीलाही वेढले. रासायनांचे ड्रम एकामागून एक पेट घेऊन आकाशात उडत होते. या आगीत कामगार संजय किर्तीकर जखमी झाला असून त्याला कुडूस येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.माहिती मिळताच वसई व भिवंडी येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवेपर्यंत कंपनी जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. त्याचा शोध घेणे सुरू असून एकूण नुकसान किती झाले याचाही तपशील गोळा केला जातो आहे. यामुळे या कंपनीतील कामगार व कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे. (वार्ताहर)