Join us

जनता भाजपच्या मेकअपला भुलली !

By admin | Updated: May 28, 2015 01:47 IST

शिवसेनेच्या चेहऱ्यावर मुखवटे व मेकअपची पुटे कधीच चढत नाहीत. आत एक व बाहेर दुसरे असले राजकारण आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवले नाही.

मग युती का तुटली? : शिवसेनेची मुख्यमंत्री आणि भाजपावर टीकामुंबई : शिवसेनेच्या चेहऱ्यावर मुखवटे व मेकअपची पुटे कधीच चढत नाहीत. आत एक व बाहेर दुसरे असले राजकारण आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवले नाही. महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे पूर्ण उच्चाटन व्हावे याकरिता शिवसेनेने जिवाचे रान केले, पण शेवटी जनता वरवरच्या मेकअपला भुलली, अशा शब्दांत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.शिवसेनेच्या मुखपत्रात ‘तसे बरे चालले आहे, पण...’ या शीर्षकाखालील अग्रलेखात फडणवीस यांच्या कोल्हापुरातील वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला. मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊन लढवणार; मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने युतीत उत्साहाचे वारे संचारले असेल. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती तुटू नये या भूमिकेचे फडणवीस असताना ती का व कोणामुळे तुटली, असा सवाल करण्यात आला आहे. प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर २५ वर्षांची युती एका झटक्यात का ्रतुटली? वातावरण का बिघडले? युतीचे दुर्दैव असले तरी फडणवीसांचे भाग्य पालटले व ते मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आनंदच आहे. तुटी तुटल्याने भाजपाची वाढलेली ताकद कळली या फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेताना आम्ही मित्रवर्याच्या आनंदावर विरजण टाकू इच्छित नाही. कारण महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे पूर्ण उच्चाटन व्हावे याकरिता शिवसेनेने जीवाचे रान केले, पण शेवटी कर्तव्यतत्परतेपेक्षा काही ठिकाणची जनता वरवरच्या मेकअपला भुलली, असा टोलाही लगावण्यात आला आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की उत्तम चालले आहे, तर गडकरी म्हणतात की, महाराष्ट्रात बरे चालले आहे. पण अधिक उत्तम चालायला हवे, अशी अपेक्षाही संपादकीयात व्यक्त करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)राज्यात सत्ता परिवर्तन झाले व सरकारला स्पष्ट जनादेश मिळाला. त्यानंतर काही चांगले धोरणात्मक निर्णय झाले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही वर्षानुवर्षांची तीच आहे. त्यामध्ये आमूलाग्र बदल करायला हवेत. तसेच महागाई, शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला योग्य भाव याबाबत निर्णय होणे बाकी आहे. याकरिता केंद्रातील सरकारला अधिक वेळ दिला पाहिजे हीच आमची भूमिका आहे.डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या

 

रामदास कदमांची नाराजीपर्यावरण खात्याचे गेल्या सहा महिन्यांत चार वेळा सचिव बदलल्याने कदम नाराज झाले आहेत. सततच्या बदल्यांमुळे आपणास कुठलाही धोरणात्मक निर्णय घेणे शक्य होत नाही. सचिवांना आपली भूमिका समजावून देत नाही तोच त्यांच्या बदलीची बातमी येते. अशामुळे मंत्री म्हणून काम करणे कठीण होत आहे.