Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकलच्या ३ ही मार्गावर आज जंबोब्लॉक

By admin | Updated: December 13, 2015 08:57 IST

तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य, पच्छिम आणि हार्बर अश्या ३ ही मार्गावर मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. हा मेगाबॉल्क साधारण ४ वाजेपर्यंत असणार आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १३ - तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य, पच्छिम आणि हार्बर अश्या ३ ही मार्गावर मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. हा मेगाबॉल्क साधारण ४ वाजेपर्यंत असणार आहे. 

पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर लाईनवर पनवेल ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी तीनवाजेपर्यत मेगाब्लॉकअसणार आहे. तसेच मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सिग्नल यंत्रणेसह ओव्हरहेड वायर आणि ट्रॅकच्या विविध तांत्रिक कामांनिमित्त हा जंबोब्लॉक घेण्यात आल्याचं समजते आहे.