नवी मुंंबई : नवरात्रौत्सवाला आज गुरु वारपासून सुरु वात झाल्यांनतर सर्वत्र आदीमायेचा जागर सुरू झाला. खारघरमध्येही तब्बल २८ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे. यामध्ये शहरातील सोसायट्यांचाही सहभाग आहे, मात्र या उत्सवात महिलावर्गाने सुरक्षेसंदर्भात योग्य काळजी घेण्याचे अवाहन खारघर पोलिसांनी यावेळी केले. नवरात्रौत्सवात पोलिसांमार्फत विशेष मोहीम राबविली जात आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांनी प्रत्येक मंडळांना भेटी देऊन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. शहरामध्ये दागिने चोरणारी टोळी सक्रिय होऊ शकते, त्या अनुषंगाने कमीत कमी दागिने महिलावर्गाने परिधान करावेत, तसेच मंडळाने जास्तीत जास्त स्वयंसेवकाची नेमणूक करावी, मंडळ परिसरात सिसीटीव्ही लावणे, डी. जे . चा वापर टाळावा, यासह शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक मंडळाने अशा सूचना पोलिसांमार्फत करण्यात आल्या. उत्सवादरम्यान शहरामध्ये गस्ती वाढविल्या असून शहरामध्ये कायदा सुरक्षा अबाधित राहील यासाठी आमची प्राथमिकता राहील, अशी प्रतिक्रि या खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
खारघर परिसरात आदिमायेचा जागर
By admin | Updated: September 26, 2014 01:39 IST