Join us

पैशांसाठी जानने स्वीकारला दहशतवादाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया (४७) हा कर्जबाजारी झाला होता. पैशांसाठीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया (४७) हा कर्जबाजारी झाला होता. पैशांसाठीच त्याने दहशतवादाचा मार्ग धरल्याचा संशय असून, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले.

एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जान मोहम्मदवर कर्ज होते. आधी तो ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. ती नोकरी सुटल्यानंतर त्याने कर्जाने एक टॅक्सी घेतली. त्याचा हप्ता भरू न शकल्याने बँकेच्या लोकांनी टॅक्सी उचलून नेली. त्यानंतर त्याने पुन्हा कर्जावर एक दुचाकी खरेदी केली. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली, असेही विनीत अग्रवाल यांनी सांगितले.

जान हा लहानपणापासून सायन येथील एमजी रोड येथील सोशलनगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक १८५ मध्ये राहतो. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. तो पत्नी आणि २२ वर्षे आणि एका ११ वर्षांच्या मुलीसह येथे राहतो. एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शालेय शिक्षण घेत आहे.

...