Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 05:33 IST

शीना बोरा हत्याप्रकरणी अटक इंद्राणी मुखर्जीला बुधवारी दुपारी जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ती भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कारागृहात बेशुद्ध झाल्याने शुक्रवारी रात्री तिला जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते.

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणी अटक इंद्राणी मुखर्जीला बुधवारी दुपारी जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ती भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कारागृहात बेशुद्ध झाल्याने शुक्रवारी रात्री तिला जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. औषधोपचारांना ती प्रतिसाद देत असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले. जे. जे. रुग्णालयात इंद्राणीवर उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर बुधवारी व्हीलचेअरवरून तिची रवानगी कारागृहात करण्यात आली.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जी