Join us

जे. डे हत्या प्रकरणाचा निकाल २ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:25 IST

वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल २ मे रोजी देऊ, असे विशेष न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणी छोटा राजन दोषी सिद्ध होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल २ मे रोजी देऊ, असे विशेष न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणी छोटा राजन दोषी सिद्ध होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.११ जून २०११ रोजी जे. डे यांची पवई येथे त्यांच्या राहत्या घराजवळ गोळी झाडून हत्या करण्यात आली. डे यांनी गुन्हेगारी जगतावर लिहिलेल्या पुस्तकामुळे छोटा राजन अस्वस्थ होता. त्यामुळे त्याने डे यांना मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. यामध्ये एका वर्तमानपत्राची वरिष्ठ पत्रकार जिग्ना व्होरा हिचाही उल्लेख आरोपीम्हणून करण्यात आला आहे. व्यवसायिक वैमनस्यातून व्होरा हिने डे यांची हत्या करण्यास राजनला चिथावल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे.

टॅग्स :न्यायालयमुंबई