Join us  

कचऱ्याचे वर्गीकरण करणे होणार आणखी सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:21 AM

नावीन्यपूर्ण प्रकल्प । पालिका कार्यालयाला भेटी देऊन विद्यार्थ्यांनी केला अभ्यास

- सीमा महांगडे 

मुंबई : मुंबईत दररोज तयार होणाºया सुमारे ८ हजार मेट्रिक टन कचºयापैकी बºयाच कचºयाचे वर्गीकरण करण्यात पालिकेला यश आले असले तरी अद्यापही काही प्रभागांत याबाबत जागरूकता नाही. महामुंबईला अधिक स्वच्छ आणि अधिक निरोगी बनवायचे असेल, तर त्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांशिवाय तरणोपाय नाही, म्हणूनच विलेपार्ले येथील एमपी स्कूल आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक कचरा विलगीकरणासाठी अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यामुळे कचरा वर्गीकरण आणखी सोपे होणार आहे.

या अ‍ॅपमुळे कचºयाचे वर्गीकरण व्यवस्थित करण्यात आले आहे की नाही हे ओळखता येतेच; शिवाय त्या कचºयामध्ये ओला कचरा, सुका कचरा यांचे प्रमाण किती आणि कसे आहे हे निश्चित करून त्यानुसार आवश्यक प्रक्रिया करता येऊ शकते.

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जगतात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया मॅस्टेक प्रोजेक्ट डीप ब्ल्यू या नुकत्याच झालेल्या स्पर्धेत कचºयाच्या वर्गीकरणावर, व्यवस्थापनावर त्यावरील उपाययोजनेसंदर्भातील एमपी स्कूल आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचा प्रकल्प नावीन्यपूर्ण तसेच पारितोषिकाचा मानकरी ठरला. हा प्रकल्प उभारण्यासाठी विद्यार्थ्यांचा पालिका कार्यालयाला भेटी देऊन तेथील संशोधनाचा अभ्यास केल्याची माहिती प्रकल्पातील प्रमुख नीलिका चक्रबर्ती हिने दिली. त्यानंतर योलोसारख्या अल्गोरिदमच्या टेक्नॉलॉजीसची माहिती घेऊन अ‍ॅप तयार करण्यात आले. या प्रकल्पात तिला मनन मेहरा आणि शिल्पिका अग्रवाल यांनी मदत केली.हे अ‍ॅप फोनवर उपलब्ध होणार असून त्यासाठी कोणत्याही सेन्सर किंवा हार्डवेअरची गरज नाही. सोबतच यात वापरलेल्या कम्युनिटी हिट मॅपमुळे कोणत्या प्रभागात/विभागात कचरा वर्गीकरण कसे आहे याचीही माहिती मिळू शकेल. या अ‍ॅपमध्ये अचूकता आणि पारदर्शकता असल्याची हमी विद्यार्थ्यांनी दिली.कचरा ज्या विभागात आहे ते ठिकाण समजणारअ‍ॅपवरून कचºयाचा फोटो घेतल्यानंतर त्याचे जीओटॅगिंग होऊन, तो कचरा ज्या विभागात आहे ते ठिकाण आपोआप समजेल. त्यानंतर फोटो काढणाºयाला त्याची तक्रार किंवा माहिती पालिकेलाही देता येईल. फोटो अ‍ॅपवर अपलोड झाल्यानंतर त्याची घनता, त्यातील घटकांचे प्रमाण यावरून ओला कचरा आणि सुका कचरा यांचे प्रमाण आणि निकाल यांचा आलेखाद्वारे वापरकर्त्याला समजेल. ओला कचरा, सुका कचरा यासोबतच तो नैसर्गिक आहे, प्लॅस्टिक आहे अशा उपप्रकारांतही त्याचे वर्गीकरण केले जाईल. कचºयाचे वर्गीकरण योग्य झाले आहे का, याची तपासणी करून त्याला क्रमांकही देता येईल.

टॅग्स :कचरा प्रश्न