Join us
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार नोंदवणे होणार सोपे

By admin | Updated: July 30, 2014 23:13 IST

ठाणे महापालिका मुख्यालयात विविध स्वरूपाचे १८ हून अधिक विभाग आहेत. परंतु, ते कुठे आहेत, त्या ठिकाणी कोणाला भेटावे लागले, याची माहिती नागरिकांना मिळत नव्हती.

अजित मांडके, ठाणेठाणे महापालिका मुख्यालयात विविध स्वरूपाचे १८ हून अधिक विभाग आहेत. परंतु, ते कुठे आहेत, त्या ठिकाणी कोणाला भेटावे लागले, याची माहिती नागरिकांना मिळत नव्हती. विशेष म्हणजे विविध विभागांशी संबंधित दिवसाला १५ ते २० तक्रारी येत असतात. यामध्ये मलनि:सारण, पाणीपुरवठा, आरोग्यासंदर्भातील तक्र ारी, घनकचरा, मालमत्ता कर अशा अनेक तक्र ारींचा समावेश असतो. अनेक नागरिकांना कोणता विभाग कोणत्या तक्र ारींशी संबंधित आहे याची माहितीदेखील नसते. जी कामे २४ तासांच्या आत झाली पाहिजेत, त्या कामांनादेखील दोन दिवस लागतात. अशा अनेक नागरिकांच्या तक्र ारी आहेत. तक्रार वेळेत पूर्ण होणे, हा नागरिकांचा अधिकार असून हे सर्व अधिकार नागरी सनदमध्ये देण्यात आले आहेत. त्याची प्रसिद्धी मात्र यापूर्वी केवळ पालिकेच्या वेबसाइटवर करण्यात आली होती. शहरातील मोठ्या संख्येने नागरिक झोपडपट्टीत राहत असल्याने त्यांना इंटरनेटवर जाऊन ही माहिती पाहणे शक्य नाही. यासाठी ही नागरिकांची सनद पालिकेच्या मुख्यालयात प्रदर्शित करावी, अशी मागणी काही दक्ष नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार, आता पालिकेने मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ती प्रदर्शित केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना याचा फायदा होणार असून आपल्या तक्रारींचा निपटारा किती तासांत, किती वेळेत होऊ शकतो, याची माहिती उपलब्ध होणार आहे.